‘अजित पवारांची मनस्थिती तपासण्याची गरज’; राष्ट्रवादीच्या उमेदवारचा अजित पवारांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुद्द मला बोलावून उमेदवारी दिली आहे. जर अपक्ष उमेदवाराला पाठींबा द्यायचाच होता, तर मग मला उमेदवारी का म्हणून दिली?, असा प्रश्न उपस्थित करत, अजित पवार यांची मनस्थिती तपासण्याची गरज असल्याचा टोला करमाळा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी लगावला आहे.

Loading...

विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून करमाळ्यात संजय पाटील घाटणेकर तर संगोल्यामध्ये दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु बुधवारी पत्रक काढत दोघांचीही उमेदवारी रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने करमाळामध्ये पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, पक्षाकडून अशा प्रकारे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आल्याने घाटणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे यांना पाठिंबा दिल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मला अदयाप शरद पवार अथवा अजित पवार यांचा फोन आलेला नाही. अजित पवार हे साफ खोटं बोलत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.