InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राष्ट्रवादीचे तिकीट उदयनराजेंनाच? शरद पवारांचे संकेत

- Advertisement -

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कलह निर्माण झाला होता. राष्ट्रवादीच्या बैठकीत एका गटानं उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उदयनराजे अस्वस्थ झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भाजपात आले तर त्यांचे स्वागतच असेल, असं वक्तव्य केले होते. ७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्यानंतर लगेचच ९ ऑक्टोबरला उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे संकेत उदयनराजेंनी दिले होते. साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी आव्हान दिलं होत. खा. उदयनराजे भोसले यांची भाजपची जवळीक वाढत असल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागणार आहे, कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातार्‍याचे लोकसभेचे तिकीट हे उदयनराजेंनाच मिळणार असे संकेत दिले आहे. ते म्हणाले सातार्‍याचे खासदार कोठे गेले, कोणाशी संपर्क वाढला, याबाबत आम्हाला काळजी आहे, असे सांगत पवार यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हालचालींवरही लक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी खा. शरद पवार पाटण (जि. सातारा) येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले माध्यमांनी खासदार उदयनराजे यांची चिंता करू नये, खासदार उदयनराजे यांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत, असेही शरद पवार यांनी सांगितले. तसेच प्रसार माध्यमांतील बातम्यांवरून निर्णय होत नाहीत. मी व प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतो. मीडियाने याची चिंता करू नये, असे खा. पवार यांनी म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.  पवार म्हणाले, साडेचार वर्षापूर्वी बारामतीत धनगर समाजाला सत्ता आल्यानंतर आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र सत्तेवर आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात अनेक मंत्रीमंडळ बैठका झाल्या आहेत. मात्र धनगर समाजाला आरक्षण न देता या समाजाची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच ‘लबाडा घरचे जेवणाचे निमंत्रण जेवल्याशिवाय खरे मानायचे नसते’ असे सांगत खा. पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रतिहल्ला केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.