‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार एवढंच माझ्या डोक्यात’; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले तरी मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार एवढंच माझ्या डोक्यात आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला हाणला. शिवसेना आणि आमची विचारसरणी वेगवेगळी असली तरी, सरकार चालवण्यासाठी किमान समान कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली.. हे सरकार पाच वर्षे टिकावे म्हणून आपण स्वतः लक्ष घालू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिलेली आहे. याकरिताच शिवसेनेसोबत आघाडी करताना किमान समान कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. विकासाभिमुख धोरणे राबविण्याबरोबरच रोजगारासंबंधीच्या समस्या आणि लोकांचे प्रश्‍न सोडविण्याची आमची मनापासून इच्छा आहे. मुख्यमंत्री कोण राहील आणि सरकार केव्हा स्थापन होईल, हे मी सांगू शकत नाही. तीनही पक्षाचे नेते एकमेकांसोबत चर्चा करीत आहेत. तेच काय ते ठरवतील. मात्र, सरकार पाच वर्षे टिकेल आणि मध्यावधीची कुठलीही शक्‍यता नसून, पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करू,” असेही पवार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.