InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

… आणि शरद पवार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबाला म्हणाले, कर्ज फेडू नका, मी बघतो!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी बीड जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला. शरद पवार यांनी खडकत गावापासून दुष्काळी दौरा केला. पवारांनी चार ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. मात्र परत जाताना शरद पवारांना एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समजलं.

आष्टी तालुक्यातील इमनगाव येथील शरद साबळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती पवारांना मिळताच त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट दिली.

यावेळी शरद पवार यांनी, आम्ही तुमच्यासोबत तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कर्ज फेडू नका आम्ही पाहून घेतो, असा धीर शरद पवारांनी कुटूंबाला दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.