‘आम्ही ताकदवान होतो, हे तरी किमान त्या मान्य करतात’; पंकजांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर

गेल्या काही दिवसांपासून भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरुन आक्रमक भाषण करत राज्यातील पक्ष नेतृत्त्वावर जोरदार टीका केली. तेसच त्यांनी नाव न घेतला धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केली परळीत माझ्याविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला ताकद देण्यात आली, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. मात्र त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेणं टाळलं. पंकजांच्या या आक्रमक भाषणावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

पेल्यातलं वादळ पेल्यातच शमेल, अशा शब्दांत पंकजांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंनी भाष्य केलं. ‘माझ्या विरोधात असलेल्या नेत्याला रसद देण्यात आल्याचं त्या (पंकजा मुंडे) म्हणतात. त्यामुळे आम्ही ताकदवान होतो, हे तरी किमान त्या मान्य करतात. सत्ता नसतानाही आम्ही सामर्थ्यशाली राहिलो, यातच सगळं आलं. मतदार त्यांच्यावर नाराज होते, हे त्यांनी मान्य करायला हवं,’ अशा मोजक्या शब्दांमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजांना प्रत्युत्तर दिलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.