InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘…यामुळेच सत्तास्थापनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत’

- Advertisement -

‘आमच्या पक्षात जी काय फुटाफुटी व्हायची ती आधीच झाली आहे. त्यामुळे आता आमचा एकही आमदार फुटणार नाही. शिवसेनसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. आमची विरोधात बसण्याची तयारी आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्तास्थापनेच्या पेचावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच ही कोंडी का निर्माण झाली, यावरही भाष्य केलं आहे.

‘आधी ठरल्याप्रमाणे सत्तेत समसमान वाटा मिळावा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. मात्र आधी जे ठरलंय ते भाजपकडून देण्यात येत नाही. यामुळेच सत्तास्थापनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपला लक्ष्य करण्याची एकही संधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सोडत नसल्याचं दिसत आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.