‘हेलपाटे न घालता कर्जमाफी आम्ही देऊ’; जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबद्दल भाजपने आक्षेप नोंदवला होता. त्यावर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावला आहे.

“….म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार”; जयंत पाटील यांचे ट्विट

‘हेलपाटे न घालता कर्जमाफी आम्ही देऊ. भाजपाने जनतेला हेलपाटे मारायला लावले,’ असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर पलटवार केला. ऑनलाईन कर्जमाफी नसल्याने भ्रष्टाचार अधिक होईल, असा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी केला होता. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी भाजपला टार्गेट केलं. ‘विरोधात बसल्यावर त्यांना असं बोलणं क्रमप्राप्त आहे. पण आम्ही हेलपाटे न घालता कर्जमाफी देऊ,’ असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला आहे.

‘दगडापेक्षा वीट मऊ’; शिवसेनेसोबत जाण्याचे कारण जयंत पाटलांनी केले स्पष्ट

‘मंत्रिमंडळ विस्तारावरून आमच्यात मतभेद नाहीत. योग्यवेळी तारीख ठरेल असं सांगितलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. काँग्रेसची यादी आली नाही. त्यांची चर्चा दिल्लीत होते. ती यादी आली की मंत्रिमंडळ विस्तार होईल,’ असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.