InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शेतकऱ्यांना कांदा अनुदान कधी मिळणार? – जयंत पाटील

कांदा अनुदानावरून एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात सरकारवर पुन्हा लक्ष केले आहे. अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान ४ महिने १५ दिवस उलटून देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेले नाहीत, असे जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हंटले आहे.

राज्यातील कांदा उत्पादक अत्यंत हलाकीच्या आणि अडचणींचा सामना करत असताना देखील राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली पाहायला मिळत नसल्याने आमदार जयंत पाटील यांनी युती सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण राज्यभर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान कांदा अनुदानावरून जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित होते, असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply