NCP on Santosh Bangar | अरेरावी करणाऱ्यांना मुख्यमंत्री महोदय कसे वेसण घालणार? ; राष्ट्रवादीचा सवाल
NCP on Santosh Bangar | मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन, असा इशारा बांगर यांनी दिला. कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कृषी पंपांच्या थकीत बिलांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे संतोष बांगर संतापले आणि त्यांनी दमदाटी केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने यावर टीका केली असून आक्षेप घेतला आहे.
“कधी मध्यान्ह भोजन केंद्रातील व्यवस्थापकाच्या कानशिलात लगवायची तर कधी पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालायची. वाद घालण्यात पटाईत असणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आता थेट महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. वीज कनेक्शन कट केल्याने ते कर्मचाऱ्यांना रट्टे देण्याची भाषा वापरत आहे. सत्तेचा गैरवापर करत अशा प्रकारचे सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे कितपत योग्य आहे? ही कोणती वागण्याची पद्धत? अशी अरेरावी करणाऱ्यांना मुख्यमंत्री महोदय कसे वेसण घालणार?”, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उपस्थित केला आहे.
संतोष बांगर यांची ओळख आक्रमक आमदार म्हणून आहे. यापूर्वी त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका हॉटेलची पाहणी करत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगर चांगलेच संतापले आणि त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावल्या होत्या.
कारवाईची मागणी-
संतोष बांगर यांनी या उपहारगृहाच्या किचनची पाहणी केली असता बराच भाजीपाला हा सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचपासून पुढे अन्न तयार करून ते लोकांना पोहचवले जात होते. तसेच शासनाने सांगितलेल्या पदार्थांपैकी कोणताच पदार्थ दिला जात नव्हते. रोज एकसारखेच अन्न दिले जात आहे. त्यामुळेच संबंधित कंत्राटदाराची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी बांगर यांनी जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडे केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Baba Ramdev | “महिलांनी काही नाही घातलं तरी…” ; रामदेव बाबांची जीभ घसरली
- Rishabh Pant | वारंवार फ्लॉप होऊनही ऋषभ पंतला संधी का?
- Chandrashekhar Bawankule | “महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे”; चंद्रशेखर बावनकुळेंची सडकून टीका
- Sanjay Raut | संजय राऊत यांच्या विरोधात ईडीची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार!
- Suryakumar Yadav | सूर्यकुमारच्या बॅटिंगवर ग्लेन मॅक्सवेलने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.