InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आता मुख्यमंत्री होण्यात कोणताही रस नाही – शरद पवार

- Advertisement -

राज्यात सध्या भाजप शिवसेनेत सत्तासंघर्ष पाहायला मिळतोय. सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. भाजपा आणि शिवसेना यांना जनमत मिळालं आहे त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं असे शरद पवार बोलताना म्हणाले.

यावेळी शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे काही समीकरण तयार झाले तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ इच्छिता का? हा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘मी चारवेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री होण्यात कोणताही रस नाही, मला मुख्यमंत्री व्हायचंच नाही’

Loading...

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे अशा चर्चाही काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट विधान केले आहे. मला मुख्यमंत्री होण्यात कोणताही रस नसल्याचे ते म्हणाले आहेत. आता राज्यातील राजकीय समिकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना भाजप युती होणार का? संजय राऊतांचे शब्द खरे ठरणार का? की शिवसेना नमतं घेणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.