राष्ट्रवादी-शिवसेना, तुम्ही दोघं हवं ते करा, एकमेकांना बुडवा, पण महाराष्ट्राला या दोघांपासून वाचवा!

परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरून बरेच राजकारण तापले आहे. त्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पदनियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी पदावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नियुक्ती केली गेली. मात्र नियुक्ती होऊ नये यासाठी शिवसेना खासदाराने थेट मंत्रालयात लॉबिंग केल्याची चर्चा होती.

यानंतर आता शिवसेना खासदार संजय जाधव यांनी या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो, असे मोठे विधान संजय जाधव यांनी केलं आहे. तसेच गोयल या जिल्हाधिकारी नको म्हणून मीच मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती, अशी कबुली जाधव यांनी घनसावंगीतील शिवसेनेच्या कार्यक्रमात दिली.

जाधवांच्या या वक्तव्यावरुन आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राला यांच्यापासून वाचवा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये केशव उपाध्ये म्हणतात, राष्ट्रवादी-शिवसेना, तुम्ही दोघं हवं ते करा, एकमेकांना बुडवा किंवा बुडवू नका पण महाराष्ट्राला या दोघांपासून वाचवा अशी प्रार्थना सध्या जनता करत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा