‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत’; राष्ट्रवादीचा आरोप

राज्यामध्ये सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेले नाही. त्यातच आता एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकींचे सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपाचे नेते या युतीवर टीका करताना दिसत आहे. मात्र या टीकेला शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे नेते उत्तर देताना दिसत आहेत. अशीच टीका काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे नेते अशिष शेलार यांच्यावर केली होती.

‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत,’ असं यावेळी आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक फोटो ट्विट करत यासंदर्भातील पुरावा देत असल्याचे म्हटले आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस ठाणेच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेलार यांचा मांत्रिकाच्या वेशातील एका व्यक्तीबरोबरचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. शेलार यांच्याबरोबर उभ्या असणारी व्यक्तीने काळे कपडे परिधान केेलेले आहेत. या व्यक्तीच्या गळ्यामध्ये अनेक माळा असून हातात मोठ्या अंगठ्या असल्याचे दिसत आहे. हा फोटो म्हणजे आव्हाडांनी केलेल्या दाव्याचा पुरावा आहे असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.