सुशोभीकरणाच्या नावाखाली वाहतुकीला अडथळा; राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेविरोधात निदर्शने

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरच्या चौकात पालिकेच्या वतीने चारही बाजूला रस्ता अरुंद करुन त्याच रस्त्याच्या कॉर्नरला पिवळे पट्टे मारण्यात आलेले आहेत. या पिवळ्या पट्ट्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिके विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. तर याविरोधात सह्यांची मोहीमही राबविण्यात आली.

शहर आणि रस्ता सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबई महानगरपालिकेने महापालिका आणि सीएसटी चौकात असणाऱ्या रस्त्यांच्या कोपऱ्यांमध्ये पिवळे पट्टे मारुन त्या ठिकाणी काही कुंड्या, तर काही बाकडी ठेवलेली आहेत. मुळातच या रस्त्यावर मोठी रहदारी आहे. चारही बाजूला सिग्नल्स आहेत. त्यामुळे वाहनांना जाण्यासाठी हा मार्ग कमी पडतो. अशातच हा रस्ता पिवळे पट्टे मारुन अरुंद केल्यामुळे इतर दिवसभर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच परिसरात दोन मोठी रुग्णालय आहेत. या परिसरात येणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या गर्दीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या परिसरातलं हे सुशोभीकरण त्वरित थांबवावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.