पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर

मुंबई : राज्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही महापुराचा तडाखा बसला. राज्यात लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सातारा आणि रायगड जिल्यात तसेच कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महापुरामुळे मृत झालेल्या व नुकसान झालेल्या घटनेवर चिंताग्रस्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. शरद पवार पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांतं लक्ष लागलं होत. यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षातर्फे शरद पवारांनी नुकसानग्रस्त व पुरग्रस्त भागाला मोठी मदत जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमार्फत तब्बल 2.5 कोटी रूपयांची मदत केली जाणार आहे. 250 डॉक्टरांची तुकडी पुरग्रस्त भागातील नागरिकांची तपासणी करेल, त्यांना योग्य ती औषधे पुरवण्यात येतील, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडुन 16 हजार कीट बनवण्यात येणार असुन त्यामध्ये दररोज लागणाऱ्या भांड्यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर ते पुरग्रस्त भागातील 16 हजार कुटुंबांना देण्यात येणार आहे. आज या संबंधीची घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा