मी मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने राष्ट्रवादींचे नेते करतात – पंकजा मुंडे

अंबाजोगाई येथे 2 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या तालुका पशुवैद्यकीय व पशुचिकित्सालयाच्या इमारतीचे उद्घाटन आणि केज तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ८० कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, विकास कामांची उद्घाटने करायला वेळ मिळत नाही. ठरवलं तर रोज पाचशे कोटी रुपयांच्या कामांची उद्घाटने करू शकते. मला फक्त विकासाचे राजकारण करायचे आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पंधरा वर्ष सत्तेत असताना एक वीटही उभी केली नाही. तेच लोक मी मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची हुजरेगिरी करुन जिल्ह्याला बारामतीच्या दावणीला बांधणाऱ्यांना निवडणुकीच्या काळात दारातही उभे करू नका, असा टोला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना थेट नामोल्लेख टाळत लगावला.

महत्त्वाच्या बातम्या – 

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.