InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राष्ट्रवादीची जाहिरनामा समिती स्थापन

- Advertisement -

युती सरकारच्या यंदाच्या कार्यकाळातील शेवटच्या विधानसभा अधिवेशनला आज सुरूवात झाली आहे. तर, सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी जाहीरनामा समितीची स्थापना केली आहे. जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading...

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीरनामा समितीची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 35 जणांची जाहीरनामा समिती जाहीर केली आहे.

Loading...

दरम्यान, याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, सुधीर भोंगळे, डॉ. मिलिंद आवाड, तर समन्वयक म्हणून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.