अन् टीकेची झोड सुरू होताच राष्ट्रवादीचे आ. राजू नवघरे ढसाढसा रडले

हिंगोली : अखंड हिंदुस्थानाच्या अस्मितेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तसेच अवघा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. शिवाजी महाराजांबद्दल सर्वांच्याच मनात आदर, प्रेम आणि अभिमानाची भावना आहे. मात्र, छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अश्वावर उभं राहून हार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजू नवले यांच्याकडून हि बाब घडल्याचं समोर आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच नवघरेंच्या या कृतीवरुन सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. नवघरे यांच्या या कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणावरुन टीकेची झोड उठल्यानंतर आमदार राजू नवघरे यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. यावर बोलताना आ.नवघरे म्हणाले की, ‘सर्वच पक्षाच्या लोकांनी मला तिथे जायला सांगितलं. मी म्हटलं राजकीय माणसाला वर पाठवू नका. पण मला त्यांनी अखेर वर चढवलं. मी तिथे पुष्पगुच्छ वाहिले आणि खाली आलो.

मात्र यावेळी तिथे सगळेच होते. पण माझ्या एकट्याचाच पाय तिथे लावल्याचं दाखवलं जातंय. तसेच जर मी कुठे चुकलो असेन तर त्यासाठी मी माफी मागतो. माझी यात कुठे चूक नाही असं मी मानतो. माझ्यासारखा एक कार्यकर्ता आमदार झाला, तर त्याच्याविरोधात सगळे पेटून उठायचं काम करत आहेत”, असं म्हणत आमदार राजू नवघरेंनी फक्त आपल्यालाच लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप केला.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा