InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

तानाजी सावंत यांच्या घरात खेकडे सोडून राष्ट्रवादीचे आंदोलन

पुण्यातील तानाजी सावंत यांच्या घरात खेकडे सोडून राष्ट्रवादीने  निषेध आंदोलन केलं. यावेळी तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीने निषेध केला. तसंच शिवाय तानाजी सावंत यांनी राजीनामा देण्याची मागणीही करण्यात आली.

रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीला खेकडे जबाबदार होते. खेकड्यांमुळे हे धरण फुटलं असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर टीका होत आहे.

धरणात खेकड्यांनी घर केल्यामुळे धरणाला गळती लागली. धरणाचं काम निकृष्ठ नव्हतं, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं.  तिवरे धरणफुटी ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही  दुर्घटना होती. गावकरी आणि अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरलं, त्यामुळेच ते फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply