NDA Meeting | आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी! दिल्लीत आज होणार ‘एनडीए’ची बैठक

NDA Meeting | नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी विरोधकांची बंगळुरू येथे बैठक सुरू आहे. तर आता विरोधकानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील बैठक आयोजित केली आहे.

आज दिल्लीत सत्ताधाऱ्यांची म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

Eknath Shinde and Ajit Pawar have been invited to this meeting

सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं योजना आखायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील हॉटेल अशोका येथे संध्याकाळी 05 वाजता भाजपकडून बैठक (NDA Meeting) बोलवण्यात आली आहे.

देशामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीची तिसऱ्यांदा सत्ता कशी आणता येईल? याबद्दल या बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

आज होणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या बैठकीला (NDA Meeting) तब्बल 38 मित्र पक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना या बैठकीचं निमंत्रण मिळालं आहे.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), बच्चू कडू (Bacchu Kadu), विनायक कोरे (Vinayak Kore), रामदास आठवले (Ramdas Athawale) आदी नेते देखील या बैठकीला उपस्थित राहतील.

दरम्यान, आज होणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या बैठकीला (NDA Meeting) भाजपनं राज्यातील मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, दिवंगत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष आणि महादेव जानकर यांचा रासप यांना बैठकीचं निमंत्रण दिलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43u3Vci