NDA vs INDIA | बंगळुरू: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आज सत्ताधाऱ्यांची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे तर विरोधकांची कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये बैठक पार पडली.
विरोधकांच्या या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला (NDA) टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) आघाडी उभारली आहे. अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स (Indian National Democratic Inclusive Alliance).
इंडियामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम सारखे तब्बल 26 राजकीय पक्ष सामील झाले आहे.
विरोधी पक्षाच्या या बैठकीदरम्यान सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तब्बल दोन वर्षांनी एकमेकांना भेटल्या आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Congress has given up its claim for the post of Prime Minister
विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात देखील चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसने पंतप्रधान पदावरची दावेदारी सोडली आहे. ही आघाडी सत्तेसाठी किंवा पंतप्रधान पदासाठी नसल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, विरोधकांची ही बैठक सुरू असताना दिल्लीत सत्ताधाऱ्यांची देखील बैठक सुरू झाली आहे. बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित आहे. सत्ताधाऱ्यांच्या बैठकीमध्ये काय चर्चा होईल? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | “विरोधकांना त्यांचा एक नेता ठरवता…”; दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांचे कान टोचले
- Neelam Gorhe | “अंबादास दानवेंनी व्हिडिओचा पेनड्राईव्ह दिलायं, पण तो बघणं म्हणजे…”; दानवेंच्या मुद्द्यावर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
- Devendra Fadnavis | कुणालाही पाठीशी न घालता या प्रकरणाची चौकशी होणार; किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Nitesh Rane | एक जायेगा तो सब जायेंगे; किरीट सोमय्या प्रकरणावरून नितेश राणेंचं सूचक विधान
- Chandrashekhar Bawankule | “समान किमान कार्यक्रम घेऊन बंगळुरूमध्ये गेलेले उद्धव ठाकरे…”; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NVGUZN