Neelam Gorhe | “नितेश राणेंच्या हातात मच्छर मारायची बॅट, त्याने…” ; नीलम गोऱ्हेंची टीका

पुणे : लोक बदनामी मुळे आत्महत्या पण करु शकतात. वैयक्तिक पोलिस अधिकाऱ्यावर दबाव आणुन त्यामध्ये सगळी यंत्रणा वाकवायची. लव्ह जिहादच्या नावाने समाजात तेड निर्माण होऊ नये. लव्ह जिहादच्या नावाखाली जर काही अयोग्य गोष्टी घडत असतील तर त्यातले सत्य सुध्दा समोर आले पाहिजे. सज्ञान असणारा जो व्यक्ती आहे त्यांच्या संदर्भात त्यााना अंतर धर्मीय विवाहाचा अधिकार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. नाही तर सैराट सारख्या घटनांना फुस दिल्यासारखं होऊ शकते. नवनीत राणा या धार्मिक व्यक्ती आहेत असे मला वाटत होते. नितेश राणे यांच्या हातात मच्छर मारायची बॅट आहे. त्याने फरक पडत नाहीफक्त मच्छर ची बॅट घेऊन समाजात परिवर्तन होत नसतं. समजने वाले को ईशारा काफी है असा टोला नीलम गोऱ्हे यांनी राणे यांना लगावला .

पुणे प्रशासनाला विनंती आहे की शाळा बाह्य ज्या मुले जे आहेत विशेषत: मुली यांचे एक सर्वेक्षण करावे. त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातुन लक्ष द्यावे जेणे करुन अश्या घटना होणार नाही. पोलिस बंदोबस्त जेव्हा असतो तेव्हा सिसिटीव्ही असतात. सत्य काय ते समोर येईल. जर का पोलिस तपासात गोळीबार केल्याचं उघड झालं असेल. आणि त्यांचे प्रवक्ते जे बोलत होते यावर कारवाई होवू शकते. रोगापेक्षा औषध भयंकर अश्या प्रकारचे वक्तव्य करत असतील तर त्याच्यामुळे कोणत्याही प्रश्नाला न्याय मिळु शकणार नाही असं आता तरी सांगता येत नाही. राजकारणामध्ये जर तर ला काही अर्थ नसतो. नितेश राणे यांच्या हातात मच्छर मारायची बॅट आहे. त्याने फरक पडत नाहीफक्त मच्छर ची बॅट घेऊन समाजात परिवर्तन होत नसतं.समजने वाले को ईशारा काफी है असा टोला नितेश राणे यांना लगावला .

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.