Neelam Gorhe | “हे तर चिंटूचे…”, नारायण राणेंच्या टीकेला नीलम गोऱ्हेंचं प्रत्युत्तर

Neelam Gorhe | मुंबई : भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणे यांचं विधान हस्यास्पद आहे. ते चिंटूचे जोक्स आहेत, माझं त्यांच्याशी कधी बोलणंही झालं नाही, तसेच 2004 नंतर मी त्यांना कधी भेटलेही नाही, असा पलटवार नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.

नीलम गोऱ्हे ताी शिवसेना सोडून चालल्या होत्या, मी थांबवलं त्यांना, शिफारशी शिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या, असं नारायण राणे म्हणाले. ताई नाराज आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, असा गौप्यस्फोट देखील नारायण राणेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.