Neelam Gorhe vs Keshav Upadhye | नीलम गोऱ्हे शिवसेनेची बाजू मांडणार ; केशव उपाध्ये यांचा आक्षेप

मुंबई : शिवसेनेची सातत्याने बाजू मांडणारे संजय राऊत यांना ईडीने अटक केल्याने त्यांच्याऐवजी आता खासदार अरविंद सावंत तसेच, आमदार नीलम गोऱ्हे यांच्यावर पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रवक्त्यांच्या बोलावलेल्या बैठीकीत हा निर्णय झाला. दरम्यान भाजप नेते केशव उपाध्ये यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

“लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद या सभागृहांचे संविधान आणि लोकशाही व्यवस्थेत असलेले महत्व नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. ही सभागृहे चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, अशी या सभागृहांचे अध्यक्ष, सभापती ही मंडळी पक्षीय राजकारणाच्या चौकटीबाहेर असतात. म्हणूनच या मंडळींनी सार्वजनिक जीवनात वावरताना कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करू नये हा लोकशाहीचा संकेत आहे”, अशे केशव उपाध्ये यांनी सांगितले.

केशव उपाध्ये म्हणाले, “या संदर्भात एक घटना आठवते. २००४ मध्ये त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे भाजपा चा मेळावा होता. त्यावेळचे विधानपरिषद सभापती प्रा.ना.स.फरांदे यांना अटलजींना भेटायचे होते. त्यासाठी ते मेळाव्याच्या ठिकाणी आले, मात्र भाजपा चा मेळावा असल्याने ते व्यासपीठावर गेले नाहीत. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी व्यासपीठामागे अटलजींची भेट घेतली. याला म्हणतात लोकशाही मूल्ये, संकेतांचा आदर करणे. विधानपरिषद उपसभापती नीलम ताई गोऱ्हे हे शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी मैदानात उतरणार ही बातमी वाचल्यावर फरांदे सरांच्या वर्तनाची आठवण झाली.”

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.