नीरजने सुवर्ण पदक केलं मिल्खा सिंग यांना समर्पित; म्हणाला…

टोकियो : तब्बल शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेली भारताच्या अ‍ॅथलेटिक्समधील सुवर्ण पदकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण जिंकत संपली. नीरजने भारताला अ‍ॅथलेटिक्स फील्ड अ‍ॅण्ड ट्रॅक प्रकारात पहिलंवहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं.

“मी हे पदक मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. ते जिथे कुठे असतील त्यांनी मला खेळताना नक्की पाहिलं असेल, अशी मी आशा करतो,” असं म्हणत नीरजने हे पदक दिवंगत दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केलं आहे.

नीरजच्या आधी ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांची कामगिरी भारताकडून सर्वोत्तम ठरली होती. नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्ण पदकासाठी भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांची इच्छा पूर्ण केली. नीरजची कामगिरी मिल्खा सिंग यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरली.

नीरज चोप्रा हा सुरुवातीपासूनच भालाफेकीत पदकाचा दावेदार मानला जात होता. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 आणि नंतर दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटरची भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा