कोश्यारी यांच्यासारखा ‘कर्तृत्ववान’ राज्यपाल पाहिला नाही; शरद पवारांचा टोला

मुंबई : ३ मार्चपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणाला सुरवात केली तेव्हा सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी राज्यपालांचा निषेध केला. “शिवाजी महाराज की’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. राज्यपालांना राष्ट्रगीतासाठी दोन वेळेस माईकवरून आमदारांना विनंती केली.

यानंतर राष्ट्रगीतानंतर त्यांनी अभिभाषणास सुरवात केली. तेव्हा पुन्हा घोषणाबाजी सुरु झाली. कोश्यारी यांनी दोन वाक्य पूर्ण करुन आपले भाषण संपवलं. ते फाईल बंद करुन राजभवनाच्या दिशेला निघून गेले. अवघ्या 22 सेकंदात राज्यपालांनी आपले भाषण आवरत पटलावर ठेवले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळातून रराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावारही ताशेरे ओढले. कोश्यारी महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक प्रकार घडत आहेत. राज्यकर्ता म्हणून मी जेव्हा काम करत होतो, तेव्हा अनेक चांगले आणि कर्तृत्ववान राज्यपाल यांचे राज्यासाठी काम पाहता आले. त्यामध्ये पीसी अलेक्झांडर यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपालही आम्ही पाहिले. पण हल्लीच्या राज्यपालावर भाष्य न केलेले बरे. मला अनेक राज्यपालांचे काम पाहता आले. पण कोश्यारी यांच्यासारखा ‘कर्तृत्ववान’ राज्यपाल पाहिला नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या