InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

….नाही तर होईल जेलमध्ये रवानगी- नितीश कुमार

जर वयोवृद्ध आई-वडिलांची सेवा केली नाही तर जेलमध्ये रवानगी केली जाऊ शकते असा मुख्यमंत्री निर्णय नितीश कुमार यांनी घेतला आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

बिहारमध्ये मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्र्यांनी राज्यातील पाल्यांना इशारा दिला आहे की, जर तुम्ही आई-वडिलांची सेवा केली नाही तर त्यांना जेलमध्ये पाठवलं जाईल. आई-वडिलांच्या तक्रारीनंतर मुलांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्याचसोबत पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयातील एकाला शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.