अश्लील व्हिडिओ रॅकेट प्रकरणातील अभिनेत्री गहना वशिष्ठचा नविन धक्कादायक आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिचं देखील नाव समोर आलं आहे. अशातच आता गहनाने एक व्हिडीओ शेअर करत काही धक्कादायक दावे केले आहेत.

मुंबईतील मालवणी येथे असणाऱ्या गहनाच्या फ्लॅटवर बेकायदेशीररित्या कब्जा करण्यात आला आहे. ज्या लोकांनी गहनाच्या फ्लॅटवर कब्जा केला आहे, त्यांच्यावर गहनाने काही गंभीर आरोप केले आहेत. “ज्या लोकांनी माझ्या घरावर कब्जा केला आहे ते लोक माझ्यावर रेप करण्याची आणि मला मारण्याची धमकी देत आहेत”, असा दावा गहनाने केला आहे.

“जानेवरीमध्ये काही अज्ञात लोकांनी माझ्या फ्लॅटवर कब्जा केला. मी ज्यावेळी फ्लॅटवर गेले तेव्हा हे लोक मला बोलले की, ‘तुझ्यात दम असेल तर आम्हाला बाहेर काढून दाखव. जर पुन्हा येथे दिसली तर तुला जमिनीत गाडू. तुझं प्रेत देखील मिळणार नाही.’ मी तिथून पोलीस चौकीमध्ये गेले त्यांना सर्व सांगितलं. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही,” असा देखील दावा गहनाने या व्हि़डीओमध्ये केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा