विकी कौशलचे नवीन कौशल्य, काढले गणपती बाप्पाचं सुंदर चित्र

मुंबई : ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ फेम अभिनेता विकी कौशलने त्याच्या अभिनयाने चाहत्यांना जणू काही वेडच लावले आहे. सध्या लॉकडाउनमध्ये मोकळा वेळ मिळाल्यानं विकीने त्याचे अनेक कौशल्य आता चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. कधी तो अभिनेत्यांची मिमिक्री करताना दिसतो तर कधी गाणी म्हणताना. यावेळी विकीने या पेक्षा वेगळे काही करत त्याची चित्रकला चाहत्यांना दाखवली आहे.

विकीने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये विकाच्या हातात एक गणपतीचं चित्र घेतलेला फोटो दिसत आहे. त्याच्या या कलेचं चाहत्यांकडून भरभरून कौतुक झालं. हे चित्र त्यानं नेमकं केव्हा काढलं हे कळलेलं नसलं, तरी लॉकडाउनमध्येच त्यानं चित्रकलेला खास वेळ दिल्याचं कळतंय.

तसेच विकीच्या ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या बिग बजेट चित्रपटाचं काम वेगानं सुरू आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी समोर आलं, तेव्हाच या चित्रपटात विकी सुपरहिरो साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्याच्या भूमिकेचे तपशील कळलेले नसले, तरी चाहत्यांना त्याची उत्सुकता आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा