InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

क्रिकेट विश्वाला मिळणार आज नवा विजेता

क्रिकेट विश्वाला आज, रविवारी नवा विजेता मिळणार नाहे. आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्डस्वर या खेळाचा जन्मदाता यजमान इंग्लंड आणि नेहमी‘ अंडरडॉग’ मानला गेलेल्या न्यूझीलंड यांच्यात होणार असून, उभय संघ पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक आहेत.

इंग्लंडने १९६६ ला फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकला; पण क्रिकेटची त्यांची झोळी रिकामीच आहे. महिला फुटबॉल संघालादेखील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इओन मोर्गनच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाचा प्रवास चढ-उताराचा राहिला. तरीही हा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पुढे आला आहे. फायनलसाठी सर्व रस्ते क्रिकेट मैदानाकडे वळतील, अशी स्थिती आहे. देशात पहिल्यांदा फुटबॉलची नव्हे, तर क्रिकेटची चर्चा होत आहे.

वन-डेत पहिल्यांदा इंग्लंडच्या कुण्या संघाने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. पहिल्या विश्वचषकात हा संघ पहिल्या फेरीत गारद झाला होता,पण त्या पराभवापासून प्रेरणा घेत या संघाने यंदा चक्क अंतिम फेरीत धडक दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply