InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गुप्तधनासाठी नवविवाहितेचा छळ; 50 दिवस ठेवले उपाशी

चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक, क्रूर आणि अघोरी अशी घटना घडली. गुप्तधनाच्या लोभापायी सलग 50 दिवस नवविवाहितेचा क्रूरपणे छळ केल्याचे समोर आले आहे. चिमूर तालुक्यातील सावरी-बीडकर गावातील कारेकर कुटुंबातून हा प्रकार समोर आला आहे. अंधश्रद्धेने विकृत झालेल्या सुशिक्षित कुटुंबाने, गुप्तधनासाठी नवविवाहितेला दररोज रात्री अडीच वाजता घरातील दर्गा धुऊन, जिवंत कासवाला मुरमुरे भरवण्यास भाग पाडले होते. सतत 50 दिवस उपासमार, मारझोड आणि अघोरी प्रकारामुळे खचलेल्या नवविवाहितेची अंनिसने कशीबशी सुटका केली.

दर्ग्यात असलेल्या जिवंत कासवाला आंघोळ घालून, पूजा अर्चना करत सुमारे दोन तास मुरमुरे खाऊ घालण्यास बजावण्यात आले होते. हे सगळे केल्याने दर्ग्याखाली असलेले गुप्तधन आपोआप वर येईल अशी कारेकर कुटुंबाची अंधश्रद्धा होती. याच दरम्यान समीरच्या अंगात ताजुद्दीन बाबा आला आणि त्याने हळद मिटण्याच्या आधीच सविताला बेदम मारहाण-चटके देण्यास सुरुवात केली. यात सासू-सासऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply