InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

News

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा १९ आगस्टपासून

सांगली, कोल्हापूर, सातारा येथील महापुरामुळे स्थगित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा १९ आगस्टपासून पैठण येथून सुरू हाेत आहे. खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा या यात्रेत सहभाग असेल. पैठण येथे १९ ऑगस्टला सकाळी ९ वाजता संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन यात्रेस प्रारंभ…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भूतानमध्ये अभूतपूर्व स्वागत

भूतानसोबतचं मैत्रीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा दोन दिवसीय भूतान दौरा आजपासून सुरू झाला. मोदींचा हा दुसरा भूतान दौरा आहे तर दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच भूतानमध्ये गेले आहेत. पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.  पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हजारो मुलं आणि…
Read More...

भारतीय सैन्याचा पाकिस्तानच्या चौकीवर हल्ला

जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करत आहे. शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाकिस्तानने राजौरी सेक्टरमधील लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केले. यामध्ये लान्स नायक संदीप थापा हे शहीद झाले. पाकच्या गोळीबाराला जवानांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिले. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने…
Read More...

‘यूएपीए’ कायद्यातील दुरूस्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान

एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याचे अधिकार देणाऱ्या बेकायदा कारवाया प्रतिबंध अर्थात 'यूएपीए' दुरुस्ती विधेयकाला सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं आहे. हे विधेयक असंवैधानिक असल्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे. यूएपीए' दुरुस्ती विधेयक २४ जुलै रोजी लोकसभेत, तर २ ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर झाले होते. राज्यसभेत…
Read More...

- Advertisement -

केंद्र सरकारने सध्या राज्यघटनेशी खेळ चालविला आहे – गणेश देवी

देशातील घटनात्मक संस्था सरकारला शरण गेल्या आहेत. न्यायपालिका असो वा निवडणूक आयोग सरकारपुढे त्यांनी नमते घेतलेले आहे. वर्तमान केंद्र सरकारने सध्या राज्यघटनेशी खेळ चालविला आहे. घटनेतील 370 सारखे महत्त्वपूर्ण कलम चुटकीसरशी रद्द करण्याचा निर्णय याचे ताजे उदाहरण आहे, अशी टीका भाषा अभ्यासक आणि पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी केलीय. अखिल भारतीय बँक…
Read More...

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल बांधणार शिवबंधन ?

बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा विचार ऐकून पक्षांतराबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती दिलीप सोपल यांनी  दिली आहे.दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला दुहेरी धक्का बसणार आहे. कारण राष्ट्रवादीकडून…
Read More...

या मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत

सांगलीमध्ये आज पूर परिस्थितीची पाहणी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केली. तसेच पुराचे राजकारण करू नये, सांगलीकरांना अनेकांनी मदत केली आहे. मात्र, सांगलीपर्यंत ती पोहचली नसल्याची दीपाली यांनी टीका केली आहे. तसेच सांगली मधील तब्बक 1 हजार मुलींचे लग्न करून देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांच्याकडून 5 कोटींची मदत ही सांगली पूर…
Read More...

हा अभिनेता म्हणाला भाजप सरकारचं वृक्ष लागवड थोतांड

महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे केवळ नाटक आहे. 5 कोटींची वृक्ष लागवड हे थोतांड आहे. या वृक्ष लागवडीवरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं. त्याच त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते असा आरोप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे. वृक्षांमध्ये 250 जाती आहेत. नगरपालिका शाळांच्या प्रत्येक अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच…
Read More...

- Advertisement -

मोदींच नेतृत्त्व मिळाल्यामुळे केवळ 48 तासात कलम 370 बाद

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यासाठी भाजप मागील 70 वर्ष आंदोलन करत होते. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे कणखर नेतृत्त्व मिळाल्यामुळे केवळ 48 तासात कलम 370 हटविण्यात आले, असे वक्तव्य भाजपाचे महासचिव राम माधव यांनी केले आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे. 31 ऑक्टोबरनंतर जम्मू-काश्मीर काही काळासाठी…
Read More...

सुवर्णविजेता बजरंग पुनियाची खेलरत्न पुरस्कारसाठी शिफारस

भारताचा कॉमनवेल्थ आणि एशियाड सुवर्णविजेता पैलवान बजरंग पुनियाची केंद्र शासनाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. बजरंगने मागील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले होते. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही याच वजनी गटात त्याने सुवर्ण पटकावले आहे. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि रोख साडेसात लाख रुपये असे या…
Read More...