InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

News

बजाज सीटी 100 इएसचे अलॉय व्हेरियंट सादर

बजाज कंपनीची सीटी 100 इएस या मॉडेलचे अलॉय व्हेरियंट बाजारपेठेत दाखल झाले आहे. याचे एक्स-शोरूम मूल्य 41,997 रूपये इतके आहे. हे नवीन मॉडेल सीटी 100 इएइ या मॉडेलची सुधारित आवृत्ती आहे. या नवीन व्हेरियंटमध्ये अलॉय व्हिल्स प्रदान करण्यात आले आहेत. यातील अन्य फिचर्स हे आधीप्रमाणेच असतील. अर्थात बजाज सीटी 100 इएस अलाँ या मॉडेलमध्ये 99.27 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर एयर कुल्ड इंजिन देण्यात आले असून ते 4 स्पीड गिअर्सला संलग्न करण्यात आले आहे. याच्या दोन्ही व्हिल्सला ड्रम ब्रेक प्रदान करण्यात आले आहेत.…
Read More...

जळगाव जिल्ह्यात एकाही शेतक-याला १० हजारांचे पीककर्ज नाही

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत एकाही शेतक-याला शासनाने जाहीर केल्याप्रमाणे खरीप हंगामाकरिता तातडीचे १० हजारांचे कर्ज मिळालेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. आधीच थकबाकी असलेल्या शेतक-यांना आणखी १० हजार रुपये कर्ज देऊन एनपीएत वाढ होण्याचीच भीती असल्याने बँकांकडून हे कर्ज देणे टाळले जात आहे. १० हजारांच्या कर्ज वितरणासाठी शिखर बँकेकडून जिल्हा बँकेला ९.५ टक्के दराने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी शासनाने दर्शविली. मात्र या कर्जाची हमी न घेतल्याने जिल्हा बँकांचे नुकसान असल्याने जिल्हा बँकांनी हात वर…
Read More...

पाच हजार ढोल-ताशा वादकांचा राज्यस्तरीय रक्तदान महायज्ञ

पुणे : गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ढोल-ताशा पथकांतील वादकांच्यावतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये ढोल ताशा महासंघ महाराष्ट्रतर्फे राज्यस्तरीय रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा निर्धार वादकांनी केला आहे. हा रक्तदानाचा महायज्ञ रविवारी ६ ऑगस्टला सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत करण्यात येणार आहे. शिबीरातील रक्तदात्यांची यादी सैन्य रुग्णालयाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे जवानांकरीता गरजेच्या वेळी ही तरुणाई रक्तदान…
Read More...

‘ब्ल्यू व्हेल’ आणि दहशत…

वेबटीम : सध्या ‘ब्ल्यू व्हेल’ सगळीकडे चर्चेचा विषय बनलाय. रशियातील 100 हुन अधिक मुलांनी या गेमपायी आत्महत्या केली आहे.  मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या शेर ए पंजाब कॉलनीमध्ये राहणाऱ्या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यामुळे भारतात देखील  ‘ब्ल्यू व्हेल’ हातपाय पसरू लागला आहे का ही चर्चा सुरु झाली .मुंबईतील या घटनेची चौकशी करुन आणि हा खेळ कसा थांबवता येईल, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करुन कारवाई केली जाईल, असे आश्वासन नुकतेच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...

व्यासपीठ : लैंगिक शिक्षण समजून घेताना

“SEX IS TOO BEAUTIFUL TO BE MADE UGLY BY IGNORANCE, GREED, AND LACK OF RESPONSIBILITY”लैंगिकता म्हणजे काय ? SEX, स्त्री पुरुष ओळखण्याचे माध्यम का स्त्री पुरुष मधील लैंगिक संबंध? स्त्री पुरुषातील लैंगिक संबंध / संभोग म्हणजे लैंगिकता असेच समजले जाते परंतु फक्त शारीरिक संबंध म्हणजेच लैंगिकता नाही. आपल्या भारतात लैंगिक शिक्षणाबद्दल खूप गैरसमज आहेत . लैंगिकता शब्दाचा उच्चार म्हणजे काही तरी गुन्हा किंवा संस्कारहीन असल्या सारखे समजले जाते. अशा ठिकाणी लैंगिक शिक्षण ते पण शाळेत कसे दिले जाईल? जेथे…
Read More...

नऊ यार्डाची मॅरेथॉन …

आत्महत्येच्या घटना ऐकून आणि अनेकांनी त्यावर लिहिलेलं बघून आयुष्य इतक कठीण असत का मला वाटायला लागल होत? इतके कठीण प्रश्न असतात कि जीवन संपवण हा उपाय शिल्लक असतो फक्त समोर. यशाची धुंदी आणि स्वतःला सिद्ध करण्यात आलेल अपयश परीक्षेतल्या मार्कांवर आणि नोकरीत मिळालेल्या पगारावर अवलंबून असते का? गोठलेल्या भावना आणि हरवत चाललेली माणुसकी ह्या सर्वात आपण खरी प्रगती केली का? असाच विचार मनात घोळत होता. त्या वेळेस एका जुन्या गोष्टीने लक्ष वेधल ते म्हणजे नऊ यार्डाची म्यारेथॉन.मॅरेथॉन ती हि नऊ यार्डाची? तर हि…
Read More...

विदर्भ मराठवाडा दुष्काळाच्या छायेत

वेबटीम : राज्यात सध्या पावसाळा सुरु होऊन एक महिना झाला आहे. तरी संपूर्ण राज्यात काही भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यांतल्या त्यात विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने शेतीतील पिके सुकू लागली आहे तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे . तर काही शेतीतील पिके आता नांगी टाकत आहे. गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दांडी दिल्याने लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. गेल्या काही वर्षापासून असलेली सततची…
Read More...

'मला काहीच प्रॉब्लेम नाही'

वेबटीम : मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून 'प्रॉब्लेम तुमचा ,सोल्युशन आमचं' म्हणत या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रॉब्लेम सोडवायला सज्ज झाली आहे. स्पृहा जोशी आणि गष्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून कोकणच्या विरोधात ठाकलेलं नागपूर या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. निर्मिती सावंत,विजय निकम,मंगल केंकरे,सतीश आळेकर,कमलेश सावंत,सीमा देशमुख, आदी मातब्बर मंडळींची साथ स्पृहा आणि गष्मीर ला लाभली आहे. दिगदर्शक विनोद लव्हेकर यांनी या चित्रपटाच्या…
Read More...

मिका म्हणतो 'हमारा पाकिस्तान'

मुंबई : गायक मिका सिंह हा नेहमीच वादात अडकत असतो , आता मिका सिंह नव्या वादात अडकला आहे. येत्या 12 आणि 13 ऑगस्टला शिकागो आणि ह्युस्टन इथे मिका सिंहचा कार्यक्रम होणार आहे. या कॉन्सर्टपूर्वी मिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘हमारा हिन्दुस्तान 15 अगस्त को आजाद हुआ था और 14 को हमारा पाकिस्तान आजाद हुआ था,’ असं मिका या व्हिडीओत म्हणाला. मिकाचं ‘हमारा पाकिस्तान’ म्हणणं भारतीयांना चांगलच खटकलं आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'मिका आता महाराष्ट्रात माईक पकडूनच…
Read More...

आर जे मलिष्काने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : ‘मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाय का’ हे गाण गायल्याने शिवसेनेकडून आर जे मलिष्काला चांगलच टार्गेट करण्यात येत आहे. अशातच आता मलिष्काने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटी बाबद मलिष्काने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या गाण्यावरून चर्चा झाली तसेच गाण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन दिल असल्याचही मलिष्काने सांगितल आहे. ‘मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाय का’ या गाण्यामधून मलिष्काने मुंबईतील रस्त्यांवरील खड्यांची पोलखोल केली…
Read More...