वयाच्या १३व्या वर्षापासून निक जोनस मधुमेहाने त्रस्त, सोशल मीडिया पोस्ट करत केला खुलासा

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तीचा पती अभिनेता निक जोनस यांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी निकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे.

निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तो टाइप १ मधुमेहाने त्रस्त असल्याचे सांगितले आहे. “मी तेरा वर्षांचा होतो, माझ्या भावांसोबत शो खेळत होतो.. आणि काहीतरी चुकीच आहे हे मला माहीत होतं, म्हणून मी माझ्या आई-वडिलांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे. माझी लक्षणे पाहिल्यानंतर, माझ्या बालरोगतज्ञांनी मला सांगितले की मला टाइप १ मधुमेह आहे”, असे निक म्हणाला.

पुढे निक म्हणाला, “मी घाबरलो होतो… याचा अर्थ संपूर्ण जगाचा दौरा करण्याचे आणि आमची गाणी सगळीकडे गाण्याचे माझे स्वप्न तिथेच संपले का? पण मी स्वत:ला वचन दिले होते, जे मी नेहमी करत आलो आहे, यामुळे माझा प्रवास हळू होणार नाही. हे कठीण दिवस आहेत मात्र, माझ्याकडे आधार आहे ज्यामुळे मी मलाच मदत करू शकतो हे मला माहित आहे आणि जेव्हा मला वाईट वाटते तेव्हा मी स्वत:कडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे,” असं निक म्हणाला. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे. तर प्रियांकाने देखील कमेंट करत त्यांची स्तुती केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा