निक-प्रियांकाच्या नात्याला तीन वर्षे पुर्ण; थ्रोबॅक फोटो शेअर करत आठवणींना दिला उजाळा

मुंबई : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि तिचा पती अभिनेता निक जोनस हे ‘लवबर्ड’ कायम त्यांच्या नात्यातील प्रेम व्यक्त करत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अशीच या दोघांची एक पोस्ट सध्या तूफान व्हायरल होत आहे.

निक आणि प्रियांकाच्या नात्याला तीन वर्षे पुर्ण होत असून दोघांनी अगदी रोमँटीक अंदाजात एक स्पेशल फोटो शेअर करत पुन्हा एकदा त्यांच एकमेकांवर किती प्रेम आहे हे जगजाहीर केलं आहे. तसेच प्रियांकाने फोटोला कॅप्शन देत लिहलं आहे की,“माझ्यासाठी तू सर्व काही आहेस… आज तीन वर्ष पुर्ण झाली आहेत.. कधी कधी असे वाटते की कालचीच गोष्ट आहे. पण डोळे उघडताच जग बदललेले दिसते. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे” या रोमँटीक फोटोमध्ये प्रियांकाच्या हातात एक स्पेशल डायमंड रींग दिसत आहे.

याचदरम्यान निकने सुद्धा त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकांऊटवर एक थ्रोबॅक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत लिहलं आहे की ,“तीन वर्षा पुर्वी”. प्रियांका आणि निकला अनेक दिग्गज कलाकारांनी शुभेच्छा दिल्या असून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा