Nikhil Wagle | घाऊक पक्षांतरं घडवणारे कलाकार म्हणून फडणवीसांचं नाव गिनिज बुकमध्ये दाखल होईल का? – निखिल वागळे
Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत बंडखोरी करत भाजपमध्ये सामील झाले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर 2 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीत बंडखोरीकर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे देखील दोन गट पडले. याच पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी फोडला असल्याचं निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. निखिल वागळे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. पक्षांतर घडवणारे कलाकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव गिनीज बुकमध्ये दाखल होऊ शकतं का? असा सवाल निखिल वागळे यांनी उपस्थित केला आहे.
ट्विट करत निखिल वागळे (Nikhil Wagle) म्हणाले, “महाराष्ट्रात विक्रमी घाऊक पक्षांतरं घडवणारे कलाकार म्हणून फडणवीसांचं नाव गिनिज बुकमध्ये दाखल होईल का?” निखिल वागळे यांच्या या ट्विटनंतर भाजप कार्यकर्ते आणि देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात विक्रमी घाऊक पक्षांतरं घडवणारे कलाकार म्हणून फडणवीसांचं नाव गिनिज बुकमध्ये दाखल होईल का?#BJP #Modi
— nikhil wagle (@waglenikhil) July 13, 2023
The state cabinet may expand after the monsoon session
दरम्यान, या सर्व घटना (Nikhil Wagle) घडत असताना राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप नेते मंत्रिमंडळ विस्ताराकडं लक्ष लावून बसले आहे. अशात या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. कारण पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील चार आमदारांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. यामध्ये भरत गोगावले, योगेश कदम, अनिल बाबर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर संजय शिरसाट आणि संजय रायमुलकर या दोघांपैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | सरकारला साथ देणार की नाही? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं
- Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला! तर खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता
- Sanjay Raut | काही लोक स्वतःहून गुलामी पत्करतात; संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात
- Cabinet Expansion | मंत्रिमंडळात कुणाला मिळणार किती जागा? जाणून घ्या सविस्तर
- Eknath Shinde | CM शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक! मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या आमदारांना मिळणार जागा?
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PWRdzG
Comments are closed.