Nikhil Wagle | शिंदे-फडणवीस युती मोडीत काढायची सुपारी तर दादांनी घेतली नाही ना? – निखिल वागळे

Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. काल (14 जुलै) अजित पवार आणि त्यांच्यासह शपत घेतलेल्या आमदारांना खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये शिंदे गटाची (Eknath Shinde) इच्छा नसताना अजित पवारांना अर्थ खात देण्यात आलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अर्थ खात अजित पवारांना देऊ नये, अशी भूमिका शिंदे गटानं मांडली होती. मात्र, तरीही अजित पवारांना अर्थ खात देण्यात आलं आहे. यावरून निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी ट्विट प्रश्न उपस्थित केला आहे. ट्विट करत निखिल वागळे म्हणाले, “शिंदे-फडणवीस युती मोडीत काढायची सुपारी तर दादांनी घेतली नाही ना? सहज आपली शंका!”

Ajit Pawar has indirectly attacked Eknath Shinde and Devendra Fadnavis

दरम्यान, शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त अजित पवार आज नाशिकमध्ये दाखल झाले आहे. कार्यक्रमापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

ते म्हणाले, “मी शो किंवा जाहिरातबाजी करणारा नेता नाही. आजच्या वर्तमानपत्रात बाहेरच्या नेत्यांनी जाहिराती छापल्या आहेत. त्याचबरोबर नाशिक शहरांमध्ये कार्यकर्त्यांनी बॅनर्स (Nikhil Wagle) लावले आहे.”

नाशिक शहरामध्ये (Nikhil Wagle) लावलेल्या अजित पवारांच्या बॅनर्सवरती शरद पवारांचा फोटो नाही. या प्रश्नाचं उत्तर देत अजित पवार म्हणाले, “शरद पवार आमचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळं बॅनर्सच माहीत नाही. परंतु त्यांचा फोटो मी माझ्या केबिनमध्ये लावला आहे.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PUbiq3