Nilesh Rane | आदित्य ठाकरेंना आजोबांच्या जयंतीचा विसर; निलेश राणे म्हणाले “गांजाप्रमुख…”

Nilesh Rane | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे कुटुंब आणि भाजपच्या राणे कुटुंबाचे वैर काही नवे नाही. ठाकरे आणि राणे कुटुंबात एकमेकांवर बोलण्याची एक संधी सोडत नाहीत. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी काल रविवारी केलेल्या एका ट्विटवरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“युवासेना गांजाप्रमुखकडून दुसरी काय अपेक्षा ठेवायची, याला जयंती आणि स्मृतिदिन मधला फरक कळला नाही. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यातला फरक कळणार नाही”, असे म्हणत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटवरुन टीका केली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त आदित्य ठाकरे यांनी काल एक ट्विट केले होते. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा “स्मृतिदिन” असा उल्लेख केला आहे. त्यावरून ते चांगलेच चर्चेत आले आहे. ट्विट पाहता नेटकऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचाच विसर पडला की काय…? असा सवाल उपस्थित केला आहे.

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांचा स्मृतीदिना! त्या निमित्त समीर देसाई फाऊंडेशन, गोरेगाव आयोजित बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले होते. बाळासाहेब ठाकरे यांची ‘जयंती’ ऐवजी ‘स्मृतीदिन’ असे ट्विट केल्यामुळे निलेश राणेंनी टीका केली.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट करुन पुन्हा जयंतीबाबतच्या आशयाचे ट्विट केल्याचे पाहायला मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.