Nilesh Rane | ‘उद्धव ठाकरेंना भारत जोडो यात्रेचं निमंत्रण’, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा म्हणाले…

Nilesh Rane | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या खूप तापलेलं दिसून येतं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. तसेच सध्या काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा जोरात सुरू आहे. या यात्रेलालाखोंच्या संख्येनं लोक या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. आता लवकरच या यात्रेचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे 9 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच या यात्रेत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले निलेश राणे (Nilesh Rane)

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एक व्यंग चित्र असलेला एक फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे. त्या व्यंग चित्रामध्ये या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या दिसत आहेत. एकीकडे भारत जोडो यात्रा दिसत आहे. या व्यंगचित्रात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही आहेत. ते आपल्या वडिलांना म्हणजेच उद्धव ठाकरे यांना ‘ बाबा इथलं झालं असेल तर तिकडे मुजरा घालायला चला’, असं म्हणत आहेत.

तसेच, काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले की, येत्या 7 नोव्हेंबर रोजी भारत छोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे. नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा पाच दिवस मुक्काम असणार आहे. तर हिंगोली जिल्ह्यात चार दिवस यात्रेचा मुक्काम असणार आहे.

पुढे बोलताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा जवळपास 120 किलोमीटर प्रवास होणार आहे.यात्रेची तायरी अंतिम टप्प्यात आहे. लाखोंच्या संख्येनं या यात्रेत लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. शरद पवार हे 9 नोव्हेंबरला या यात्रेत सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे यांना देखील या यांत्रेच निमंत्रण देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे देखील या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.