Nilesh Rane | “उद्धव ठाकरे साहेब याच्यातून काहीतरी शिका…”; शरद पवारांच्या वक्तव्यावरून निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला होता. मात्र, ऐनवेळी शरद पवारांनी पाठ फिरवली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) इशारा दिला आहे.

Sharad Pawar was negotiating with uddhav Thackeray & BJP at same time – Nilesh Rane

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. शरद पवार जेव्हा तुमच्याशी बोलणी करत होते तेव्हाच ते भाजपशी देखील बोलत होते. उद्धव ठाकरे साहेब यातून काहीतरी शिका, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

ट्विट करत निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, “उद्धव ठाकरे साहेब याच्यातून काहीतरी शिका… पवार साहेब जेव्हा तुमच्याशी बोलणी करत होते त्याच वेळेस भारतीय जनता पक्षाशी पण करत होते, नंतर कोणाची सत्ता बसली हे नगण्य आहे पण पवार साहेब फक्त त्यांच्या सोयीचच बघतात हे परत एकदा सिद्ध झालंय.”

दरम्यान, शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, “भाजप सत्तेत आल्यावर राष्ट्रवादी भाजपला बाहेरून पाठिंबा देईल, असं आम्ही जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र, तसं झालं नाही. आमचा या शपथविधीला पाठिंबा असता तर हे सरकार राहिलं असतं. परंतु ते सरकार दोन दिवसांत पडलं.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NRf0zs

You might also like

Comments are closed.