Nilesh Rane | “पवार साहेब असे एकमेव व्यक्तिमत्व…”; भाजप नेत्याची पवारांवर बोचरी टीका

Nilesh Rane | मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका-टिपण्णी झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेच्या 40 आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी सेनेत बंडखोरी केली आणि सेनेचाच वेगळा गट तयार केला. याच पार्श्वभूमीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र भाजपचे नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

“पवार साहेब एकमेव व्यक्तिमत्व असतील महाराष्ट्रात ज्यांच्यावर कोणालाच विश्वास नाही, अशी राजकीय कारकिर्द काय कामाची? उद्धव ठाकरे स्वत: म्हणाले होते माझं लक्ष पवार साहेबांवर होतं पण आमचे निघून गेले याचाच अर्थ उद्धव ठाकारेंचा देखील शरद पवारांवर विश्वास नव्हता”, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, निलेश राणे यांना संधी मिळताच ते ठाकरे कुटुंब, शिवसेना आणि पवार कुटुंबावर बोलणे टाळत नाहीत. राणे आणि ठाकरे कुटुंबाचा वाद काही नवा नाही. मात्र राज्यात झालेल्या सत्ताबदल आणि  महाविकास आघाडीमध्ये झालेल्या या बदलावरुन निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.