Nilesh Rane | फक्त फोन करून किंवा सूचना देऊन काही होत नाही; निलेश राणेंची अजित पवारांवर खोचक टीका

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसांपासून कोकणामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे चिपळूण आणि परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे.

याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात करण्याच्या सूचना अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली होती. या प्रकरणावरून निलेश राणे यांनी अजित पवार गटावर खोचक टीका केली आहे.

ट्विट करत निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, “फक्त सूचना देऊन आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून चिपळूणचा विषय सुटणार नाही.

राष्ट्रवादीचे आमदार श्री शेखर निकम हे तिथे निवडून आले आहेत आणि सध्या ते तुमच्या गटात आहे, वाशिष्ठी नदीचा गाळ आणि कोयना धरणाचं अवजल या दोन कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण होते.

जोपर्यंत या दोन विषयांचा विचार होत नाही तोपर्यंत दरवर्षी चिपळूणला हीच परिस्थिती सहन करावी लागते. पाऊस आल्यानंतर सूचना देऊन काही उपयोग नाही, पावसाळा नसताना चिपळूणसाठी नियोजन आणि काम दोन्ही गरजेचे आहे.”

Ajit Pawar had tweeted after the rains increased in Chiplun

चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केलं होतं. ट्विट करत अजित पवार म्हणाले, “कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे.

चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडून चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला.

हवामान खात्यानं येत्या चार दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, मदतकार्य तसंच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.”

दरम्यान, अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर भाजपच्या काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. अशात निलेश राणे यांनी केलेल्या या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केलेल्या ट्विटवर  अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44xOaSW