Nilesh Rane | “हा व्यक्ती स्वतः वडिलांच्या पेन्शनवर जगतोय”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Nilesh Rane | मुंबई : राज्यात सध्या अनेक विषयांवरुन राजकारण सुरु आहे. त्यातच आता नव्या विषयाची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे राज्यात जुनी पेन्शन योजना सुरु करण्याची मागणी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांनी केली आहे. याच मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. जुनी पेन्शन सुरु करण्याची मागणी करत राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी याविरोधात संप देखील पुकारला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संप मागे घेण्याचं आवाहनही कर्मचाऱ्यांना केले आहे.

उद्धव ठाकरेंचं जुन्या पेन्शनबाबत वक्तव्य

अशातच आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी शिंदे-फडणवीसांवर टीका करताना म्हणाले की, ‘मी आत मुख्यमंत्री असतो तर जुनी पेन्शन योजना लागू केली असती’, असं म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

“हा व्यक्ती स्वतः वडिलांच्या पेन्शन वर जगतोय”, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारला टाळे ठोकले आहे. सरकारने जुनी पेन्शन लागू करायला काय हकरत आहे? मुख्य म्हणजे सरकारला इतकी मोठी महाशक्ती पाठिशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठाकरे गट ठामपणे उभा”

“सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी ठाकरे गट ठामपणे उभा आहे. देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. मग फडणवी- मिधे सरकार याबाबत आट्या पाट्या का खेळत आहे? जे हक्काचं आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालंच पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-