Nilesh Rane | “ही मस्ती लोक फक्त महाराष्ट्रातच करतात” ; निलेश राणे राहुल गांधींवर संतापले
Nilesh Rane | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी वीर सावरकरांबाबत (Veer Savarkar) केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण पेटले आहे. सत्ताधारी आक्रमक झाले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्यात महाविकास आघाडीत देखील दुफळी पडल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, “राहुल गांधीची यात्रा दक्षिण भारतातून सुरू झाली आणि उत्तर भारतात संपणार. दक्षिण भारतातल्या त्यांच्या महापुरुषांबद्दल उलटसुलट बोलायची हिंमत राहुल गांधी (Rahul Gandhi) काय कोणीही करत नाही आणि उत्तर भारतातही तसेच आहे. ही मस्ती हे लोक फक्त महाराष्ट्रातच करतात आणि आपलीच लोकं त्यांना प्रसिद्धी देतात.”
“राहुल गांधी यांच्या यात्रेला महाराष्ट्रात येण्याअगोदर कुत्र विचारत नव्हतं, वीर सावरकरांचे नाव घेतलं आणि देशभर राहुल गांधींनी यात्रा काढली आहे, हे लोकांना कळलं. राहुल गांधी आता तुम्हाला काँग्रेसची लायकी कळली असेल वीर सावरकरांचे नाव घेतल्याशिवाय काँग्रेस व तुमची दखल कोणी घेत नाही,” असे निलेश राणे म्हणाले.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया-
“राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. या देशातील हुकूमशाहीकडे नेणारे वातावरण, देशाला पुन्हा पुन्हा गुलामगिरीच्या बेड्या ठोकणार, महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराविरोधात भारत जोडो यात्रा आहे. मात्र वीर सावरकरांचा विषय काढण्याचे काही कारण नव्हते. यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना धक्का बसला. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी का उचलून धरत नाहीत. वीर सावरकर हे भाजप आणि संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते, असा इतिहास आहे. पण आता राजकारणासाठी त्यांनी वीर सावरकरांचा विषय घेतला आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्ष बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने वंदना सुहास डोंगरे यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत ‘स्वातंत्र्यसैनिकाची बदनामी आणि स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या’प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ५०० आणि ५०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी-
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, वीर सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिले की, “मै आपका नौकर रहना चाहता हु” आणि त्यावर स्वाक्षरी केली. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली. त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचा पत्रावर सही करून विश्वासघात केला.
महत्वाच्या बातम्या :
- Rahul Gandhi | “तुम्हाला बॉम्बने…” ; राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी
- Sanjay Raut | वीर सावरकर हे भाजप आणि संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते – संजय राऊत
- Govinda Naam Mera | ‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार विकी कौशल्यचा ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपट
- Sachin Sawant । “सत्य कटू असलं तरी ते सत्यच असतं…”; राऊतांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसचा पलटवार
- Sanjay Raut | सावरकर वाद पेटला! महाविकास आघाडीत पडणार फुट?, संजय राऊतांचा राहुल गांधींवर घणाघात
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.