Nilesh Rane | “बदनामीचा दावा करायला मार्केटमध्ये काहीतरी इज्जत असावी लागते”;

Nilesh Rane | मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बदनामीचा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. ‘‘२००४ साली आपणच संजय राऊत यांना खासदार केलं. त्यावेळी त्यांचं नाव मतदार यादीत नव्हतं.’ असा दावा राणे यांनी केला होता. राणेंच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत राऊतांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. दरम्यान, यावर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे.

“मुळात बदनामीचा दावा दाखल करायला मार्केटमध्ये कसलीतरी इज्जत असावी लागते”, असं म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. ज्याचं नाम नाही तो बदनाम होऊ शकत नाही, असंही ते म्हणालेत. टीका करत असताना त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्या या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. माझं शिक्षण विद्यापीठातून झालंय. अनेक निवडणुकात मी मतदान केलं. २००४ साली माझं नाव मतदार नोंदणी यादीत होतं. त्यांनी यादी चेक करावी, असं राऊत म्हणाले. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करेन. किरीट सोमय्यांवर देखील मी खटला दाखल करणार आहे. फक्त मीच नाही तर शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप होत आहेत ते सर्व नेते खटले दाखल करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :