InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘केंद्राकडे भीक का मागताय?’; निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. केंद्राने दोन वर्षांसाठी महसूल माफ केला तर महाराष्ट्र कर्जमुक्त होईल, अशी मागणी उद्धव यांनी केली होती. यावरुनच भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पोरकट म्हटलं आहेत. तसेच केंद्राकडे महसूल माफीची भीक कशाला मागता असा सवालही निलेश यांनी उपस्थित केला आहे.

निलेश राणेंनी उद्धव यांना ट्विटवरुन टोला लगावला आहे. “काय पोरकट मुख्यमंत्री आहे. प्रत्येक राज्यातून जो महसूल जातो तो केंद्र सरकार परत वेग वेगळ्या मार्गाने राज्यातच पाठवतात. मागायचे असेल तर महाराष्ट्र ज्या प्रमाणात महसूल पाठवतो त्याच प्रमाणात राज्यात परत आला पाहिजे ही मागणी करा. भीक का मागताय??,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.