निर्भयाला त्वरीत न्याय मिळवून द्या – अण्णा हजारे

देशातील वाढत्या महिला अत्याचारांविरोधात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आवाज उठवला आहे. निर्भया प्रकरणातील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका पत्रातून केली आहे. तसेच यासाठी २० डिसेंबरपासून राळेगणसिद्धी येथे मौनव्रत धारण करण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला कळवले आहे.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात हजारे म्हणतात, “निर्भया प्रकरणात आरोपी दोषी ठरले असून त्यांना फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. मात्र, गेल्या ७ वर्षांपासून याप्रकरणी शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. न्यायाला होणाऱ्या उशीरामुळेच देशातील जनतेने हैदराबादेत झालेल्या एन्काऊंटरसारख्या शिक्षेचे स्वागत केले आहे. निर्भया प्रकरणात न्यायासाठी होत असलेला उशीर लोकशाहीला शोभणारा नाही, यातूनच अराजकतेची परिस्थिती निर्माण होते. न्याय मिळण्यास उशीर होत असल्याने देशातील जनता अस्वस्थ आहे. त्यामुळे जनतेकडून झटपट न्याय देणाऱ्या एन्काऊंटरसारख्या शिक्षेचे स्वागत केले जात आहे. माझ्या मते आपल्या न्यायव्यवस्थेसाठी देखील ही काळजी निर्माण करणारी गोष्ट आहे.” इंडिअन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.