InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘काँग्रेसचा पराभव होणे हे दुर्दैव; राहुल गांधींना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही’

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणे, हे दुर्दैव होते. त्यासाठी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही, असे मत वायव्य मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय निरुपम यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची (CWC) बैठक होत आहे. यावेळी राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, राहुल यांनी राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची पाठराखण करायला सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.