Nitesh Rane | आदित्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं रक्त भगवं आहे का ? – नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज (22 मे) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीसह खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) त्यांनी निशाणा साधत टीका केली आहे. तर संजय राऊत ( Sanjay Raut) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यामध्ये सतत शाब्दिक मतभेद पाहायला मिळतात. तसचं राणे यांनी नाना पटोले ( Nana Patole) यांना आगामी निवडणूकिबाबत सल्ला देखील दिला आहे.

काय म्हणाले नितेश राणे

नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलेल्या डीएनए टेस्टचा (DNA Test) उल्लेख करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray), संजय राऊत ( Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे( Aditya Thackeray) यांचं रक्त भगवं आहे का ? याची डीएनए टेस्ट आम्ही करू मग कळेल की त्यांचं रक्त हिरवा झालंय की भगवं राहील आहे”. अशा शब्दांत टोला लगावत निशाणा साधला आहे. तसचं पुढे राणे म्हणाले, संजय राऊत ( Sanjay Raut) सर्वात मोठा जादूटोना करणारा तुझा मालक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे. काळी जादू करून ठाकरेंनी काय काय केलं हे आम्हाला माहीत आहे. असं देखील नितेश राणे ( Nitesh Rane) म्हटलं

Nitesh Rane Targeted On Sanjay Raut And Uddhav Thackeray

दरम्यान, मातोश्रीच्या पाठीमागच्या भागात जेसीबीने खोदून लिंब का टाकलेली याची माहिती द्यावी का?, असा प्रश्न नितेश राणे ( Nitesh Rane) यांनी उपस्थित केला. याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलताना नाना पटोले ( Nana Patole) यांनी लवकरात- लवकर लक्षात घ्यायला पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस ( Ncp) आणि ठाकरेंची शिवसेना तुमच्यासोबत खेळी करत आहे. कारण काही दिवसांपूर्वी बिकेसीवर एक बैठक झाली. त्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यात ती बैठक झाली. त्यात जास्त जागा आपण घ्यायच्या आणि उरलेल्या जागा काँग्रेसला ( Congress) द्यायचं अस ठरलंय. अशी माहिती माझ्याकडे आली आहे. यामुळे कसं कर्नाटकच्या डी. के शिवकुमार यांच्यासोबत मुख्यमंत्री पदावरून झालं ते तुमच्याबाबतीत महाराष्ट्रात होईल. तुमचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नचं राहील यामुळे लक्ष द्या. असा सल्ला नितेश राणे ( Nitesh Rane) यांनी पटोलेंना ( Nana Patole) दिला .

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3oqGgLd