Nitesh Rane | आदित्य ठाकरेंच्या आयुष्यातला शकुनी कोण? नितेश राणे म्हणतात…
Nitesh Rane | सिंधुदुर्ग: भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आयुष्यातले शकुनी आहे, असं नितेश राणे म्हणाले आहे. त्याचबरोबर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या राजकीय आयुष्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Varun Sardesai plays the role of Shakuni Mama in Aditya Thackeray’s political career – Nitesh Rane
नितेश राणे म्हणाले, “आदित्य ठाकरे यांच्या सर्व जवळचे लोकं त्यांना सोडून चालले आहेत. याबाबत आदित्य ठाकरेंनी विचार करायला हवा. ज्या प्रकारे संजय राजाराम राऊत उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातले शकुनी आहे. त्याचप्रकारे आदित्य ठाकरे यांच्या राजकीय जीवनात वरुण सरदेसाई (Varun Sardesai) शकुनी मामाचं पात्र करत आहे. कारण वरुण सरदेसाईमुळे युवासेनेतील नेते चालले आहे. पक्षांतर करणाऱ्या लोकांना पक्ष सोडण्याचं कारण विचारलं तर सर्व लोक एकच उत्तर देतील, ते म्हणजे वरुण सरदेसाई.
पुढे बोलताना ते म्हणाले, “वरुण सरदेसाई यांच्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या जवळ कुणी राहिलेलं नाही. कोविड घोटाळा प्रकरणामध्ये देखील वरुण सरदेसाईचं नाव येऊ शकतं. त्यामुळे वरुण देसाईला आवर घातला नाही तर आदित्य ठाकरेंची अवस्था उद्धव ठाकरेंप्रमाणे होईल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रिटायर करण्याचं काम वरुण सरदेसाई आणि संजय राऊत करत आहे.”
दरम्यान, नितेश राणे यांनी संजय राऊतांवर देखील घणाघात केला आहे. नितेश राणे म्हणाले, “शरद पवार यांनी राज्यातील गायब झालेल्या मुलींची आकडेवारी सांगितली. संजय राजाराम राऊत यांच्यामुळे मुंबईतील एका डॉक्टर महिलेचं आयुष्य बरबाद झालं आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना संजय राजाराम राऊत यांनी तिचं जगणं मुश्किल केलं होतं. त्या महिलेला शरद पवारांनी न्याय मिळवून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | आदित्य ठाकरेंनी मोर्चा काढणे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड – संजय शिरसाट
- Bank Holidays In July 2023 । जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँक बंद राहतील, पाहा सुट्ट्यांची यादी
- Sanjay Raut | आज फसवणुकीची जयंती तर पुढच्या वर्षी फसवणुकीची पुण्यतिथी; संजय राऊतांनी शिंदे गटाला धरले धारेवर
- Gold Silver Rate Today । सोने खरेदीदारांना दिलासा! आता ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार सोने, पाहा नवीन दर
- Supriya Sule | भाजप च्युइंगमसारखा बेचव होत चालला आहे – सुप्रिया सुळे
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Nq1LnW
Comments are closed.