Nitesh Rane | आदित्य ठाकरे, ठाकरे नावावर कलंक; नितेश राणेंची ठाकरे गटावर सडकवून टीका
Nitesh Rane | सिंधुदुर्ग: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) खोचक टीका केली होती. देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. याबद्दल बोलत असताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर खोचक वार केला आहे.
Devendra Fadnavis has taken care of Uddhav Thackeray more than a blood brother – Nitesh Rane
नितेश राणे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी तुला (उद्धव ठाकरे) रक्ताच्या भावापेक्षाही जास्त सांभाळलं आहे. तुझे सगळे लाड सहन केले आहे. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तुझे सगळे लाड पुरवले. तुझ्यासारखा नीच प्रवृत्तीचा माणूस दुसऱ्याला नाव ठेवून कलंकित म्हणतो. पण तू स्वतः तर मर्दानगीवर कलंक आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “तुझा तो कार्टा मुलगा (आदित्य ठाकरे) ठाकरे नावावर कलंक आहे. दिशा सालियान याला कसं मारलं. हा फक्त दिशा सालियान या विषयामुळे घाबरत नाहीये. 08 जुन रोजी आदित्य ठाकरेनं लहान मुले का आणली? यांचं उत्तर देखील त्यांनी आम्हाला द्यावं. आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे?”
“बाळासाहेब ठाकरे यांनी कमावलेलं जे ठाकरे नाव आहे, त्या ठाकरे कुटुंबाच्या नावाला कलंक लावण्याचं काम आदित्य ठाकरे करत आहेत. आज उद्धव ठाकरे जे घाबरलेले आहे, त्याचं मूळ कारण आदित्य ठाकरे आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार आहे हे उद्धव ठाकरेला माहित आहे”, असही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस कलंकित काळी हळद लावून बसलेय – संजय राऊत
- Sanjay Raut | महाराष्ट्राचे संपुर्ण सरकारच कलंकित – संजय राऊत
- Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना फोनवरून मिळाली जीवे-मारण्याची धमकी
- Nitesh Rane | नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, मर्दानगीवर कलंक…
- Supriya Sule | “ना थका हूँ, ना हारा हूँ…”; सुप्रिया सुळेंचं ‘ते’ ट्वीट चर्चेत
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NLKq93
Comments are closed.